पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

चला राजकारणात!

लेखक: दीपक पटवे
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत: रु २००
पृष्ठसंख्या:२०७ पाने
वर्गवारी: वैचारिक : राजकीय : नवीन पुस्तके


पुस्तक परिचय
    

सध्या राजकारणाबद्दल समाजात प्रचंड नकारात्मक पद्धतीने बोलले जाते. याचे कारण 'राजकारण म्हणजे भ्रष्टाचार' ही लोकांची समजूत दृढ झाली आहे. याला अर्थातच रोज उजेडात येणारे हजारो-लाखो कोटींचे घोटाळे कारण आहेत. राजकारण्यांची राजेशाही जीवनशैली आणि त्यासाठी मिळेल तिथे ओरपण्याची त्यांची वृत्ती यामुळेही हा समज दृढ झाला आहे. परिणामी, एकंदरच राजकीय नेते, पक्ष आणि राजकारण हे समस्त भारतीयांच्या दृष्टीने काहीसा घृणा आणि तुच्छतेचा विषय झाले आहे. साध्या साध्या कामांसाठीही शासकीय पातळीवर सामान्य माणसांना जी ससेहोलपट अनुभवावी लागते, त्यातून प्रशासन आणि राजकारण याविषयीची नकारात्मकता वाढत जाते. हे राजकारण बदलायचं असेल तर काय करायला हवं, या प्रश्नाच्या शोधातून 'चला राजकारणात!' या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. राजकारणात जेवढी चांगली माणसं, विशेषत: तरुण येतील, तेवढा राजकारणाचा गढूळ प्रवाह कमी होत जाईल, हा त्यावरचा एक उपाय आहे. तरुणांनी राजकारणात यावं यासाठीच पत्रकार दीपक पटवे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांनी भारतीय राजकीय विश्वाची- म्हणजे भारतीय राज्यघटना, पक्षपद्धती, निवडणूक पद्धती, प्रत्यक्ष राजकीय पक्ष आणि त्यांच्या यंत्रणा आदी माहिती या पुस्तकात दिली आहे. राजकारण बदलायचं असेल तर आपली मानसिकताही बदलली पाहिजे. अशा बदललेल्या, सकारात्मक मानसिकतेच्या तरुणांनी राजकारणात प्रवेश करायला हवा. त्यातूनच भारतीय राजकारण अधिक विधायक स्वरूपाचे व्हायला मदत होऊ शकेल.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=19774


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
4 stars Ave. rating: 4 from 1 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 


  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 1
  •