पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

हेरगिरीचा पोरखेळ

लेखक: जॉर्जिना हार्डिग
अनुवादक: उज्ज्वला गोखले
प्रकाशक:
किंमत: रु २४०
पृष्ठसंख्या:२३० पाने
वर्गवारी: कादंबरी : नवीन पुस्तके


पुस्तक परिचय
 

युरोप-अमेरिकेत हेरगिरी, रहस्यमयता, अद्भुतता या विषयांवरील कथा-कादंबर्‍यांचं मोठं आकर्षण आहे. त्यामुळे या विषयांवरील कथा-कादंबर्‍या मोठय़ा प्रमाणात लिहिल्या-वाचल्या जातात. जॉर्जिना हार्डिग या अशाच रहस्यमय कादंबर्‍या लिहिणार्‍या ब्रिटिश लेखिका आहेत. त्यांची 'द सॉलिटय़ूड ऑफ थॉमस केव्हज' ही पहिली कादंबरी बरीच गाजली. त्यानंतर त्यांनी 'द स्पाय गेम' ही कादंबरी लिहिली. तिचा हा मराठी अनुवाद. अद्भुतता आणि नाटय़मता ही दोन या कादंबरीची वैशिष्टय़ं आहेत. १९६१ मधील हिवाळ्यातील एका गोठलेल्या सकाळी कॅरोलिन अचानक गायब होते. त्यानंतर आठ वर्षांची अ‍ॅना आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ पीटर यांना त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे, एवढंच सांगितलं जातं. पण आपली आई हेर होती, याची तिच्या बोलण्यातून आलेली पुसटशी कल्पना आणि नंतर वर्तमानपत्रातील बातम्या यातून पिटर-अ‍ॅना वेगवेगळ्या कल्पना करतात. पुढे मोठेपणी अ‍ॅना आईचा शोध घ्यायला लागते, त्यातून तिला कल्पनातीत सत्य समजते. त्याची ही गोष्ट आहे. अतिशय हळूवार मांडणी आणि मन हेलावून टाकणारे प्रसंग यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=19773


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
4.5 stars Ave. rating: 4.5 from 3 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

प्रकाशक: ॐ प्रकाशन

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 2
  •