पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती

कवडसे पकडणारा कलावंत

लेखक: विजय पाडळकर
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत: रु १८०
पृष्ठसंख्या:२३० पाने
वजन:२९० ग्रॅम
बांधणी:Paperback
वर्गवारी: व्यक्तिचित्रण : ललित


पुस्तक परिचय
 

`कवडसे पकडणारा कलावंत’ हे मराठी साहित्यातील एक नावीन्यपूर्ण पुस्तक आहे. देशोदेशींच्या कथा व कथाकार हा पाडळकरांच्या आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे. श्री. पाडळकरांनी ह्या ग्रंथात श्रेष्ठ कथाकार अंतोन चेकॉव्हचे जीवन व त्याच्या कथा यांचे रसग्रहणपूर्वक विश्र्लेषण केले आहे. चेकॉव्हच्या दोनशेहून अधिक कथांचा अभ्यास करून, तसेच त्याची चरित्रे, आठवणी, पत्रव्यवहार यांचा धांडोळा घेत पाडळकरांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे.उणेपुरे 44 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या चेकॉव्हच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटना व त्यांच्याशी समांतर, एक कथाकार म्हणून त्याचा होत गेलेला विकास याचे चित्रण करताना कलावंताच्या अंतरंगातील माणूस शोधण्याचा प्रयत्न पाडळकर तरल संवेदनशीलतेने व एकाग्र चिंतनाने करतात. पाडळकरांची निखळ जीवननिष्ठा त्यांना या अभिनव शोधात मूल्यविवेकापासून ढळू देत नाही. चेकॉव्हचे मोठेपण मान्य करूनही त्याच्या मनुष्यपणाला पडलेल्या चिरांकडे देखील पाडळकर तेवढ्याच साक्षेपाने वाचकांचे लक्ष वेधतात.साहित्य अधिक मार्मिकतेने समजावे व जीवनातील अर्थगर्भतेचे आकलन व्हावे अशी धारणा असणार्‍या रसिकांना व अभ्यासकांना हे पुस्तक आश्र्वासक वाटेल.


या पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/?book=19759


हे पुस्तक आपण वाचले आहे का?,वाचले असल्यास ते कसे वाटले?
Not Rated stars Ave. rating: Not Rated from 0 votes.
 या पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता!.

 

आपल्याला हे पुस्तक कसे वाटले?,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.

 Book Review
Your Name:- Your Email:-
Review:-
 
Write the following word:

Not readable? Change text.
 
 माहितीपर    
मराठी पुस्तककोश.... 

  • ८, फिनिक्स, तिसरा मजला
  • ४५७ वि.प. मार्ग
  • गिरगांव-मुंबई-400004,महाराष्ट्र,
  • Email: ashokkothawale@majesticprakashan.com
  • Phone: ०२२-२३८२६२२५ /

  • या प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 584

  • या प्रकाशन संस्थेशी संपर्कासाठी आपण अशोक कोठावळे यांच्याशी संपर्क करु शकता.
  •